Home Cities अमळनेर सबगव्हाण सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन यांची बिनविरोध निवड

सबगव्हाण सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन यांची बिनविरोध निवड

0
115


अमळनेर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सबगव्हाण विकासो सोसायटीची चेअरमन निवड प्रक्रिया नुकतीच बिनविरोध पार पडली.

 

सबगव्हाण विकासो सोसायटीच्या चेअरमनपदी सुर्यकांत पाटील तर व्हाईस चेअरमनपदी जयश्री राजेंद्र पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. याप्रसंगी सर्व निर्वाचित सदस्य हजर होते. यात अविनाश भिमराव पाटील, भरत श्रीराम पाटील, भाऊसाहेब सिताराम पाटील, भटु नामदेव पाटील, तुकाराम नारायण पाटील, सतीलाल विश्राम पाटील, भगवान गंगाराम पाटील, सचिन अशोक बेहरे, अनिता लक्ष्मण पाटील यांचा समावेश होता. सर्वानी नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे अभिनंदन केले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी आर. यु.पाटील होते. सहाय्यक श्री. वारुळे, सचिव विजयशेखनाथ पाटील (विजुआप्पा), रमण शिवराम पाटील व गामस्थ, सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.


Protected Content

Play sound