डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात राम नवमी उत्साहात साजरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भगवान श्रीराम नवमीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतून भक्तिभाव, एकात्मता आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम पाहायला मिळाला.

कार्यक्रमाची सुरुवात गोदावरी फाऊंडेशनचें राजपुरोहित डि. टी. राव यांच्या हस्ते प्रभू श्रीराम षोडशोपचार व जन्मोत्सवाच्या पारायणाने झाली. त्यानंतर हवन, पूजन आणि आरतीचा कार्यक्रम पार पडला. महाविद्यालयातील डॉक्टर्स, कर्मचारी, विद्यार्थी आणि रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.

दुपारनंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ माया आर्वीकर, रंजना राव आणि रोटी मेकर महिलासह विद्यार्थ्यांनी रामायणावर आधारित नृत्य-नाटिका सादर केल्या. भजन, कीर्तन व पाळणे,समूहगानाच्या माध्यमातून रामभक्तीचा माहोल निर्माण झाला.

कार्यक्रमाचे संयोजन डॉ. उल्हास पाटील संस्थेच्या अन्नपूर्णंलयम समितीने केले होते. यावेळी संस्थेचे संचालक डॉ वैभव पाटील,वैद्यकीय संचालक डॉ एन एस आर्वीकर अधिष्ठाता डॉ प्रशांत सोळंके,वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रेमचंद पंडीत, पियुष भंगाळे आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते इतर मान्यवरांनी कार्यक्रमाचे कौतुक करत भगवान श्रीरामांच्या आदर्श जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक होत असल्याचे आयोजकांनी सांगितले

Protected Content