नवी दिल्ली वृत्तसंस्था । राम जन्मभूमि वादाबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज त्रिस्तरीय मध्यस्थ समिती नेमण्याचे निर्देश दिले आहेत.
राम जन्मभुमी वादाबाबत आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी झाली. यात या प्रकरणाच्या मध्यस्थी साठी न्यायमूर्ती खलीफुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीत आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पंचू यांचा समावेश करण्यात आला आहे. मध्यस्थतेची कारवाई कॅमेर्यासमोर करण्यात यावी असे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिली आहे. मध्यस्तीची ही प्रक्रिया पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार आहे. याची प्रक्रिया उत्तर प्रदेशातील फैजाबादमध्ये पार पडणार आहे. मध्यस्थीसाठी समितीला आपले काम १ आठवड्यांमद्ये सरू करायचे असून पुढील ८ आठवड्यांमध्ये आपला अहवाल सादर करावा लागणार आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने या प्रकरणाबाबतच्या बातम्या प्रसारित करण्यावरही प्रतिबंध लावला आहे.
गरज असेल तर मध्यस्थ पॅनलमध्ये आणखी सदस्य नियुक्त केले जाऊ शकतात असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.