जळगाव प्रतिनिधी । रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज सादर केला.
खासदार रक्षाताई खडसे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या सोबत पक्षाचे मातब्बर नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर खासदार रक्षाताई खडसे यांनी गत म्हणजे २०१४ सालच्या निवडणुकीप्रमाणेच आपल्याला मतदार भरभरून प्रतिसाद देऊन विजयी करणार असल्याचा आशावाद व्यक्त केला. राज्य वा राष्ट्रीय पातळीवरील कोणते स्टार प्रचारक येथे येणार असा प्रश्न उपस्थित केला असता, त्यांनी जिल्ह्यातच नाथाभाऊ, गिरीशभाऊ, गुलाबभाऊ यांच्यासारखे स्टार प्रचारक असल्याचे सांगितले.
दरम्यान, आधी आमदार स्मिता वाघ या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती देण्यात आली होती. तथापि, त्यांनी आज आपला अर्ज दाखल केला नाही. मुहूर्त पाहून त्या स्वतंत्र अर्ज दाखल करणार असल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली.