भुसावळ प्रतिनिधी । भाजप-शिवसेना व रिपाइं (आठवले गट) महायुतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारासाठी आज शहरातून फेरी काढण्यात आली.
आज सकाळी संतोषी माता मंदिरात प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. याप्रसंगी आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर गंगाराम प्लॉट परिसरातून प्रचार फेरी काढण्यात आली. यात प्रचार प्रमुख युवराज लोणारी, अमोल इंगळे, गिरीश महाजन, राजू नाटकर, वसंत पाटील, देवा वाणी, दिनेश नेमाडे, परिक्षित बर्हाटे, माजी नगरसेवक सुरेश देवकर, माजी नगरसेवक किरण महाजन, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष शैलेजा पाटील, अलका शेळके, सुरेखा देवकर, रत्ना महाजन, सीमा प्रशांत नरवाडे, निखिल वायकोळे, नारायण रणधीर, शंकर शेळके, राम पाटील, संतोष ठोकळ, राहुल तायडे, नंदू ठाकूर, अतुल पाटील, नितीन चतुर, प्रवीण भारंबे, अरुण दुधे, रवी दाभाडे, बंडू पाटील, विकी खडसे, गिरीश नाले, नवल पाटील समस्त गंगाराम प्लॉट मधील नागरिक व भाजप कार्यकर्ते कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.