( रक्षाताई खडसे यांचा सत्कार करतांना मंगळग्रह मंदिराचे विश्वस्त मंडळ. )
अमळनेर प्रतिनिधी । रावेर मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांनी मंगळग्रह मंदिरात दर्शन घेऊन प्रार्थना केली.
लोकसभेच्या नुकतीच निवडणुकीची धामधूम सुरू असताना अनेक मातब्बर नेते मंदिरांमध्ये जाऊन देवाला साकडे घालण्याचा प्रयत्न करीत आहे .
अमळनेर येथील भाविकांचे श्रद्धा स्थान मंगळ ग्रह मंदिर या ठिकाणी आतापर्यंत अनेक दिग्गज शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून आपली मनोकामना पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने अनेक राजकीय नेते सुद्धा श्री मंगळ ग्रह मंदिरावर येऊन मंगळ महाराजाला साकळे घालून आशिर्वाद घेतांना दिसत आहे. या पार्श्वभूमिवर खासदार रक्षाताई खडसे यांनीदेखील मंगळ ग्रह महाराज मंदिराचे दर्शन घेऊन मंगळग्रह महाराजाला साकळे घातलेले आहे.
याप्रसंगी मंगळग्रह संस्थानचे अध्यक्ष डिगंबर महाले व विश्वस्त मंडळ यांनी खासदार रक्षा खडसे यांचा सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. श्री मंगल ग्रह महाराज मंदिरा विषयी त्यांना माहिती दिली व त्यांनी आजूबाजूच्या परिसरात पाहून त्यांनी संस्थांनचे अध्यक्ष व संचालक मंडळाचे अभिनंदन केले.