धानोरा, ता. चोपडा प्रतिनिधी । धानोर्यासह परिसरात वादळी वार्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून आज खा. रक्षा खडसे यांनी शेतकर्यांना मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.
याबाबत वृत्त असे की, अलीकडेच अवकाळी वादळी पावसामुळे धानोरा आणि परिसरातील शिवारात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष करून केळीची खोडे यामुळे जमीनदोस्त झाली असल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत. या पार्श्वभूमिवर, आज सकाळी खासदार रक्षा खडसे यांनी धानोरा तसेच परिसरात निसर्गाच्या फटक्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी शेतकर्यांच्या व्यथा जाणून घेत त्यांच्या नुकसानीचे पंचनामे होऊन त्वरीत मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली. दरम्यान, खासदार रक्षाताई यांनी देवगाव येथील जलसंधारणाच्या कामांना भेट दिली. तसेच त्यांनी पारगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची पाहणी देखील केली.
याप्रसंगी खासदार रक्षाताई खडसे यांच्यासोबत शांताराम आबा पाटील, आत्माराम माळके, घनशाम अग्रवाल, बीडीओ कसोदे, तहसीलदार गावीद, तालुका कृषी आधिकारी चौधरी, शेखर निकम, माणिकचंद महाजन, पंकज पाटील, राकेश पाटील, डॉ विक्की सोनवणे, हनुमंतराव महाजन, प्रदीप पाटील,मगन बाविस्कर,नितिन निकम, धनंजय पाटील, जितेंद्र महाजन, सरपच किर्ती पाटील आदींची उपस्थिती होती.
पहा : खासदार रक्षा खडसे यांच्या नुकसानीच्या पाहणीबाबतचा हा व्हिडीओ वृत्तांत.