राज्यसभेत महामारी सुधारणा विधेयक मंजूर

नवी दिल्ली- राज्यसभेत आज महामारी सुधारणा विधेयक-२०२० मंजूर करण्यात आले. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामण यांनी हे विधेयक आज राज्यसभेत मांडले. 

कोरोना संसर्गाच्या काळामध्ये डॉक्टर, वैद्यकीय आणि पॅरामेडीकल कर्मचाऱ्यांवर हल्ले करणे, त्यांचा अपमान करणे असे प्रकार घडले होते. त्यावर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने महामारी कायद्यामध्ये बदल करीत असे प्रकार करणाऱ्यांविरोधात तुरुंगवासासह आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारने याविषयी अध्यादेश जारी केला होता.

दरम्यान, केंद्र सरकार नवा राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य कायदा तयार करण्यासाठी काम करीत असल्याचे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. ते म्हणाले, गेल्या ३ ते ४ वर्षांपासून केंद्र सरकार जैविक संकट, महामारी या संकटांशी सामना करण्यासाठीच्या उपाययोजनांवर काम करीत आहे. सध्याच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा आणि अन्य कायद्यांमध्ये नसलेल्या विषयांसाठी हा नवा कायदा असणार आहे. सध्या याविषयी मध्यप्रदेश, त्रिपुरा, गोवा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांसह एकुण १४ राज्यांकडून सुचना प्राप्त झाल्या असल्याचेही डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले.

Protected Content