भाजप जळगाव जिल्हाध्यक्षपदी आ. राजूमामा भोळे यांची निवड

जळगाव प्रतिनिधी । हरीभाऊ जावळे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी जळगावचे आमदार राजूमामा भोळे यांची निवड करण्यात आली आहे.

माजी खासदार व आमदार हरीभाऊ जावळे यांची या वर्षाच्या प्रारंभी भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. यानंतर हरीभाऊंचे दुर्दैवी निधन झाल्यामुळे या पदावर नेमकी कुणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू होती. या अनुषंगाने आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून राजूमामा भोळे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड जाहीर केली आहे.

आमदार राजूमामा भोळे यांनी याआधी जळगाव महानगराध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. यानंतर आता त्यांच्यावर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देखील आली आहे. या माध्यमातून भाजपने पुन्हा लेवा पाटीदार समाजाला या पदाची संधी दिल्याचेही स्पष्ट झाले आहे.

Protected Content