राजकीय खटल्यांच्या सुनावणीला अनुपस्थिती; मान्यवरांना दंड

जळगाव प्रतिनिधी । जमाव बंदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर जिल्हा पेठ, एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील बड्या राजकीय नेत्यांचाही समावेश होता. न्यायालयीन सुनावणीत हजर न झाल्याने त्यांना नोटीसा काढण्यात आल्या होत्या. आज न्यायालयात हजर झाले असता प्रत्येकी 500 रूपयांचा दंड ठोठावण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शहरातील अजिंठा चौफुली, आकाशवाणी चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आणि घंटानाद केला होता. सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग, जमाव बंदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हा पेठ ठाणे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी खासदार ईश्वरलाल जैन, आमदार सतिश पाटील, जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, परेश कोल्हे, भगत बलाणी, निलेश सुधाकर पाटील, गफ्फार मलीक, मनोज दयाराम चौधरी, वाल्मीक विक्रम पाटील, सलीम इनामदार, गणेश बुधो सोनवणे, इब्राहिम मुसा पटेल, मिर नाजीम अली, मंगला भरत पाटील, अयाज अली, विशाल देवकर यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत न्यायालयीन कामकाज सुरू आहे. मात्र न्यायालयीन कामकाजाच्या वेळी अनुपस्थित राहत असल्याने न्यायालयाने सर्वांना हजर राहण्याचे नोटीसा बजावल्या होत्या.

माजी खासदार ईश्वरलाल जैन, रविंद्रभैय्या पाटील, विशाल देवकर, गफ्फार मलीक, वाल्मीक पाटील, इम्राइम पटेल, परेश कोल्हे, मंगला पाटील हे सोमवारी न्यायालयात हजर झाले. त्यांना प्रत्येकी 500 रूपयांचा दंड न्यायालयाने ठोठावला. उर्वरित गैरहजर राहणाऱ्यांना देखील नोटीसा बजावण्यात आल्या असून पुढील सुनावणी 21 आणि 30 मे रोजी होणार आहे. न्यायालयाचे कामकाज ॲड. कुणाल पाटील, ॲड. अजिम शेख, ॲड. इम्रान हुसेन आणि ॲड. निखिल कुलकर्णी यांनी पाहिले.

Add Comment

Protected Content