जळगाव प्रतिनिधी | सुरुवातीला तिरंगा यात्रा आणि त्यांनतर जलपुरूष, राजेंद्रसिंह यांच्या हस्ते जलपूजन करून खासदार उन्मेषदादा पाटील यांनी कानळदा येथून गिरणा परिक्रमा यात्रेस प्रारंभ केला.
याप्रसंगी आ. राजूमामा भोळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी आमदार स्मिताताई वाघ, भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महर्षी कण्वाश्रमाचे स्वामी अद्वैतानंद, पंचायत समिती सदस्य हर्षल चौधरी आदींसह अन्य पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
कानळदा येथील कण्व आश्रमापासून आज शनिवार, दि.१ जानेवारी २०२२ रोजी ‘गिरणा पुनरुज्जीवन अभियानास’ सुरुवात करण्यात आली असून या अभियानाद्वारे गिरणा नदीच्या जतन, संवर्धनासाठी पायी ‘गिरणा परिक्रमा’ करत गावागावात भेट देत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.
गिरणापूजन जलपूजन करून गिरणा परिक्रमा व्हिडीओ लिंक
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1011488479405516
अजूनही खळाळून वाहू शकते गिरणामाई ! : राजेंद्रसिंह
”गिरणा नदी आज संकटात असली तरी तिला पुनरूज्जीवीत करणारे घटक अजून देखील उपलब्ध आहेत. यामुळे प्रयत्न केल्यास गिरणा नदी पुन्हा एकदा खळाळून वाहू शकते !” असे प्रतिपादन जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी केले. कानळदा येथील महर्षी कण्वाश्रमाच्या परिसरात जलपूजन करून गिरणा परिक्रमेचा शुभारंभ झाल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. याप्रसंगी त्यांनी विस्तृत विवेचन करून गिरणा नदी पुनर्जिवीत होऊ शकते, मात्र यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा हवी असे प्रतिपादन केले.
‘गिरणा नदी’ संदर्भात जलपुरुष राजेंद्रसिंह नेमके काय म्हणालेत ? याविषयी व्हिडीओ लिंक :
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/332503815400577
सुरू झाली खा. उन्मेष पाटील यांची गिरणा परिक्रमा !
गिरणा नदी पुनर्जिवीत करण्यासाठी आणि पर्यायाने या नदीच्या दोन्ही काठांवरील जनतेच्या हितासाठी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी आजपासून गिरणा परिक्रमा ही यात्रा सुरू केली आहे. याच्या अंतर्गत ते गिरणा काठांवरील गावांमध्ये जाऊन नदीचे महत्व पटवून देण्यासह जनजागृती करणार आहेत. आजपासून कानळदा येथून ही यात्रा सुरू झाली आहे.
गिरणा यात्रा प्रवासाची व्हिडीओ लिंक :
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/347266143456011
कानळदापासून सुरु झालेल्या या गिरणा परिक्रमेत शनिवारी फुपनगरी, वडनगरी, खेडी व आव्हाणे, नीमखेडी या गावांलगत खासदार उन्मेशदादा पाटील यांनी जनजागृती करत पायी चालत प्रवास केला. त्यानंतर दुपारी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं. या अभियानात जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमी, विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील सहभागी झाले. या सर्व सहभागी संस्था, पदाधिकारी मान्यवरांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला.
‘बांबू मॅन’ पाशा पटेल यांना सन्मानपत्र देऊन गौरव
माजी आमदार तथा ‘बांबू मॅन’ म्हणून ख्यात असणारे पाशा पटेल यांचा आज जिल्हा नियोजन भवनात आयोजीत कार्यक्रमात सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जलपुरूष राजेंद्रसिंह, खासदार उन्मेष पाटील, आमदार राजूमामा भोळे, जिल्हा परिषध अध्यक्षा रंजनाताई पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती. याच कार्यक्रमात पर्यावरण संवर्धनासह जनहिताची कामे करणार्या संघटनांचाही गौरव करण्यात आला.
गौरव क्षणाचं प्रक्षेपण Video Link :
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1105575673587530
नद्यांचे पुनरूज्जीवन आवश्यक : राजेंद्र सिंह
जलपुरूष राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत आज जिल्हा नियोजन भवनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात त्यांनी, “नदी ही मानवी जीवनाचा अविभाज्य घटक असून मृतपाय होण्याच्या मार्गावर असणार्या नद्यांचे पुनरूज्जीवन आवश्यक असल्याचे” प्रतिपादन केले.
पहा राजेंद्रसिंह यांच्या जलसंचयावरील मार्गदर्शनाची व्हिडीओ लिंक
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/651392545981874