दुचाकी चोरीतील चोरट्याला तांबापुर परिसरातून अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सिंधी कॉलनीतून आठ महिन्यांपुर्वी चोरलेली दुचाकी विक्रीसाठी आलेल्या संशयिताला जिल्हा पेठ पोलीसांनी बुधवारी तांबापूर परिसरातून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत केली आहे. गौरव अशोक मोटवाणी रा. जालना असे अटक केलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की,  निमखेडी शिवारातील रहिवासी असलेले विलास नारायण महाजन यांची दुचाकी (क्र. एमएच.१९, सीएच ३१४३) ही  १६ जानेवारी २०२३ रोजी सिंधी कॉलनीतून चोरीला गेली होती. याप्रकरणी महाजन यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.  ही दुचाकी गुन्हेगार गौरव मोटवाणी याने लांबविली असून बुधवारी १३ सप्टेंबर रोजी तो तांबापुरा भागात दुचाकी विक्रीसाठी आल्याची माहिती पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यांनी पोहेकॉ सलीम तडवी, पोकॉ रवींद्र साबळे, तुषार पाटील, जयेश मोरे, कैलास शिंद यांचे पथक पाठवून त्याच्यावर कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने दुपारी १ वाजता तांबापुरा भागात मोटवाणीचा शोध घेतला असता तो दुचाकीसह मिळून सापडला. पोलिसांनी दुचाकी आणि चोरट्याला ताब्यात घेतले. त्याच्या जवळील चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.

Protected Content