
जळगाव (प्रतिनिधी) राजर्षी शाहू महाराज हे राजा असण्याबरोबर प्रजेला समान न्याय देऊन शिक्षणाची वहिवाट सामान्यांना खुली करून देणारे समाजसुधारकही होते, असे विचार सार्वजनिक विद्यालय असोदा येथील कार्यक्रमा प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना पर्यवेक्षक डॉ. मिलिंद बागूल यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला प्रथमतः माल्यार्पण करण्यात आले. के.बी. तायडे यांनी आपल्या मनोगतात शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला. सचिन जंगले यांनी शाहू महाराजांनी अस्पृश्यता निवारणासाठी केलेल्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. वृषाली चौधरी यांनी स्त्री-शिक्षणाला तसेच सक्तीच्या शिक्षणाची अंमलबजावणी करणारे शाहू महाराज आदर्श होते. तर शुभांगीनी महाजन यांनी शाहू महाराज कर्तृत्ववान आणि समानन्याय तत्ववादी असल्यानेच इतिहासाने दखल घेत शासन स्तरावर सामाजिक न्यायदिवस साजरा होत असल्याचे सांगितले. याप्रसंगी सानिश पिंजारी, निशा माळी,अलिशा पिंजारी, गुणवंती पाटील, राजश्री साळुंके,स्नेहल कोल्हे, या विद्यार्थ्यांनी भाषणे दिली. कार्यक्रमास संस्थाध्यक्ष विलासदादा चौधरी, मुख्याध्यापिका विद्या खाचणे, एल. जे.पाटील,मंगला नारखेडे विचारमंचावर उपस्थित होते.सूत्रसंचालन चारूलता टोके तर आभार एस.डी. कचरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी भावना महाजन , भारती पाटील यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमास बहुसंख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.