डॉ.राजू सरवदेंना राजर्षी छत्रपती शाहू महाराज राज्यस्तरीय पुरस्कार

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | प्रताप महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.राजू छगनराव सरवदे यांना लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज राज्यस्तरीय पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. रायबा बहू उद्देशिय शिक्षण संस्था,धुळे(शासन नोंदणी क्रमांक- महा १७३/२०२२/रजि.नंबर एफ १५३०१/धुळे) यांच्या वतीने नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, ॲडव्होकेट राकेश पाटील, प्रमोद पाटील यांच्या हस्ते डॉ. प्रवीण सरवदे यांचा सत्कार करण्यात आला.

सामाजिक क्षेत्रात सतत प्रेरणा वृद्धिंगत करण्यासाठी व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येते.या पुरस्काराचे स्वरूप भव्य मोमेंटो व प्रमाणपत्र असे आहे. या यशा बद्दल प्राचार्य डॉ.अरुण जैन,डॉ.जयंत पटवर्धन, उपप्राचार्य डॉ.विजय तुंटे, उप प्राचार्य डॉ.अमित पाटील, प्रा.शशिकांत जोशी, डॉ.मुकेश भोळे यांनी सत्कार केले तर खा. शि. मंडळाचे सहसचिव डॉ.धिरज वैष्णव, डॉ.व्ही.बी.मांटे, प्रा.हर्षवर्धन जाधव, डॉ.तुषार रजाळे, ग्रंथपाल दिपक पाटील, डॉ.अशोक पाटील, डॉ.एस.बी.नेरकर, डॉ.कैलास निळे, डॉ.रवि बाळसकर, डॉ.माधव भुसनर, डॉ.जितेंद्र पाटील, प्रा.विजय साळुंखे, डॉ.विवेक बडगुजर, प्रा.रामदास सुरळकर, प्रा.जयेश साळवे, डॉ.सुनिल राजपूत यांच्यासह कुलसचिव राकेश निळे, देवेंद्र कांबळे, भटू चौधरी, विजय ठाकरे, अजय साटोटे, कमलाकर पाटील, जयदेव पाटील, योगेश बोरसे, ओम गोसावी, संदिप बिऱ्हाडे आदींनी डॉ.आर.सी. सरवदे यांचेकौतुक व अभिनंदन करून पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिले

Protected Content