मुंबई प्रतिनिधी । तब्बल साडे आठ तासानंतर ईडी कार्यालयातून बाहेर आलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देता ते निवासस्थानी निघून गेले आहेत.
आज सकाळी ११.३० वाजता राज ठाकरे कुटुंबासह ईडी कार्यालयात उपस्थित झाले. यानंतर तब्बल साडे आठ तास राज यांची चौकशी करण्यात आली. रात्री साडेआठच्या सुमारास राज ईडी कार्यालयातून बाहेर पडले. याप्रसंगी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कोणत्याही प्रश्नाला उत्तर दिले नाही. दरम्यान, राज ठाकरे यांना ईडीकडून पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.