बामणोद येथून अल्पवयीन मुलीला पळविले

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील बामणोद येथून अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील बामणोद येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ११ जून रोजी सकाळी साडे आठ वाजता अल्पवयीन मुलगी घरी एकटी असतांना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. पिडीत मुलीच्या कुटुंबियांनी तिचा परिसरासह नातेवाईक आणि मैत्रीणींकडे शोधाशोध केली परंतू कुठेही आढळून आली नाही. अखरे सोमवारी १३ जून रोजी कुटुंबियांनी फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम.जे. शेख करीत आहे.

 

Protected Content