पावसाचा हाहाकार ! बिहारमध्ये १७ जणांचा मृत्यू

bihar

पाटणा वृत्तसंस्था । बिहारमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे. राजधानी पाटणासह अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून राज्यात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बिहारमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पाटणा, भागलपूरसह राज्यातील १५ जिल्ह्यात पावसाने मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. भागलपूर शहरातील हनुमान घाट, मायागंज आणि महाराज घाट या परिसरात दुर्दैवी घटना घडल्या आहेत. भागलपूरमध्ये पावसामुळे भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. पाटणाच्या खगौलमध्ये एका रिक्षावर झाड कोसळल्याने रिक्षातील चार प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. याचबरोबर दानापूर रेल्वे स्टेशनच्या गेटवर उभ्या असलेल्या रिक्षावर झाड कोसळल्याने दीड वर्षाच्या मुलीसह तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. या चारही लोकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. राज्यात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Protected Content