भुसावळ प्रतिनिधी । येथील रेल्वे ट्रॅकमन्स असोसिएशनतर्फे आज रक्तदान शिबीर आणि सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
रेल्वे कर्मचारी ट्रॅकमन्स असोसिएशन अर्थात ‘RKTA’ या संघटनेतर्फे आज शहरातील कृष्णचंद्र थिएटरमध्ये रक्तदान शिबीर व सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे राष्ट्रीय नेते व्ही. रवी आणि गणेश्वर राव या मान्यवरांची उपस्थिती होती. तर डीआरएम राकेश यादव यांनी कार्यक्रमाला मार्गदर्शन केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी कार्यशाळेला संबोधित केले.
रेल्वे ट्रॅकमन्स हे अगदी सिमेवरील सैनिकांप्रमाणेच अतिशय कठीण परिस्थितीमध्ये काम करत असतात. मात्र याच्या तुलनेत त्यांना फार कमी प्रमाणात सुविधा मिळत असतात. यामुळे सरकारने त्यांना विविध सुविधा पुरवण्याची मागणी करण्यात आली. तसेच त्यांना स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून पदोन्नतीची संधी मिळावी अशी मागणीदेखील याप्रसंगी करण्यात आली. तर डीआरएम राकेश यादव यांनी ट्रॅकमनला सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली. यानंतर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
पहा : रेल्वे ट्रॅकमन्सच्या कार्यक्रमाबाबतचा हा वृत्तांत.