जळगाव प्रतिनिधी । शिवाजीनगर रेल्वे पुलाचा सांगाडा उचलण्यासाठी ९ एप्रिल रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार असून यासाठी महाबली क्रेन आणल्या आहेत.
शिवाजीनगर रेल्वे पूल पाडण्याचे काम गत काही दिवसांपासून सुरू आहे. यातील बहुतांश भाग हा पाडण्यात आला असून यासाठी काही मिनी ब्लॉक घेण्यात आले आहेत. मात्र या पूलाचा सर्वात महत्वाचा भाग असणारा सांगाडा शिल्लक आहे. यासाठी मंगळवार दिनांक ९ एप्रिल रोजी मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. या प्रक्रियेतील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे सांगाडा उचलण्याचे काम हे रेल्वे प्रशासनाच्या क्रेनच्या मदतीने करण्यात येणार आहे. यासाठी रेल्वेच्या महाबली क्रेन्स जळगावात दाखल झाल्या आहेत. एकाच वेळेस टनोगणती वजन असणारी सामग्री उलण्यास सक्षम असणार्या या क्रेन्स सर्वसाधारणपणे वापरण्यात येणार्या क्रेन्सपेक्षा अनेक पटीने जास्त आहेत. या पार्श्वभूमिवर, महाबली क्रेनची माहिती देणारा हा व्हिडीओ.
पहा : महाकाय क्रेनची माहिती देणारा व्हिडीओ.