भुसावळात रेल्वे गँगमनचा खून ; तीन सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

0court 383

भुसावळ, प्रतिनिधी | आपल्यापेक्षा वयाने लहान असलेला तरुणाने आपल्यास एकेरी बोलल्याने दोघा तरुणांमध्ये झालेल्या वादातून रेल्वे गँगमन असलेल्या तरुणाचा खून झाल्याची माहिती पुढे आली आहे. रात्री उशिरा अटकेतील आरोपींविरुद्ध बाजारपेठ पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आज शनिवार रोजी भुसावळ न्यायालयात हजर केले असता आरोपी नीलेश यास ३ दिवसांची पोलिस कोठडीचे आदेश न्यायालयाने सुनावले आहे.

संशयीत आरोपी व टॅटू काढून आपली गुजराण करणारा निलेश चंद्रकांत ताकदे (२६, जुना सातारा, भुसावळ) हा जामनेर रोडवरील हॉटेल खान्देश परमीट रूम अॅण्ड बिअर बारमध्ये शुक्रवारी रात्री मद्यप्राशन करीत असतांना काही वेळाने रेल्वेतील गँगमन पिंटू उर्फ विकास वासुदेव साबळे (३५, गंगारॉम प्लॉट, भुसावळ) हादेखील मद्यप्राशनासाठी आला. यावेळी निलेशने पिंटू भाऊ, अशी हाक मारली. मात्र पिंटू यास आपणास निलेशने एकेरी पिंटू, उच्चारल्याचा समज पिंटू यास झाल्याने उभयतांमध्ये जोरदार शाब्दीक चकमक झाली. यावेळी निलेशने मयत पिंटूची माफी मागितली व संशयीत निलेश घरी गेला. मात्र डोक्यात राग असल्याने त्याने मयताला पुन्हा मोबाईलवर फोन करून शिवीगाळ केली व तो पुन्हा हॉटेलमध्ये आला. यावेळी काऊंटरजवळ पिंटू मद्यप्राशन करीत असतांना त्याच्याशेजारी निलेशही बसला. यावेळी दोघांमध्ये पुन्हा वाद होवून शाब्दीक चकमक झाली. आरोपी बाथरूममध्ये गेला व बाहेर आला व क्षणाचाही विलंब न लावता बेसावध पिंटुला पाठीमागून धरून पेपर कटरने त्याच्या गळ्यावर सपासप वार केले. यामुळे पिंटुच्या गळ्याच्या नसा फाटून मोठा रक्तस्त्राव होवून पिंटू जागीच कोसळला व गतप्राण झाला. आरोपीने लागलीच तेथून पळ काढला.दरम्यान रात्री उशिरा बाजारपेठ पोलिसात मयताचे मामा राजू सोपान नेवले यांच्या फिर्यादीनुसार आरोपी निलेश चंद्रकांत ताकदे (२५, जुना सातारा, भुसावळ) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हॉटेलमध्ये झालेल्या वादातून शिवीगाळ करण्यात आल्याने पिंटूचा खुन करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान रात्रीच तासाभरात पोलिसांनी आरोपीस अटक केली होती. आज शनिवार ३१ रोजी आरोपीस न्यायालयात हजर करण्यात आले असता ३ सप्टेबर पर्यन्त पोलिस कोठड़ीचे आदेश सुनावण्यात आले आहे.

हॉटेल खान्देशला तुर्तास सील

हॉटेलमध्ये मदयप्राशन करतांना झालेल्या वादातुन पिंटूचा खून झाल्याने घटनास्थळावरुन काही महत्वपूर्ण नमूने घेण्याकरीता प्रयोगशाळेचे स्पेशालिस्ट पथक येणार असल्याने हॉटेल खानदेश तुर्तास सील करण्यात आले आहे.

Protected Content