चैतन्यतांडा येथे आढळला बेवारस मृत रेडा

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील चैतन्य तांडा येथील कनिष्ठ हॉटेलजवळ एका रेड्याचा मृतदेह दोरीने बांधलेला अवस्थेत आढळून आला आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील चैतन्य तांडा शिवारातील कनिष्ठ हॉटेल जवळील रस्त्यालगत दोरीने बांधलेल्या अवस्थेत एका बेवारस रेड्याचा मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान या घटनेबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना कळताच. त्यांनी गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांना कळविले. यावर गटविकास अधिकारी वाळेकर यांनी ग्रामसेवक कैलास जाधव यांना सांगताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामीण पोलिसांनी पाहणी केल्यानंतर पंचनामा करण्यात आले असून सदर रेड्याचा मुळमालक कोण आहे? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र रेड्याचा घातपात झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. हि मंगळवार रोजी दुपारी उघडकीला आली आहे. 

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी एकच झुंबड केली. येथील भोजराज शेठ , पुन्शी शेठ यांच्या जेसीबी व ग्रामस्थांच्या साहाय्याने त्या रेड्याचे विल्हेवाट लावण्यात आले आहेत. यावेळी करगाव विकास सोसायटीचे माजी चेअरमन दिनकर राठोड,  सरपंच अनिता राठोड, उपसरपंच आनंदा राठोड, ग्रामसेवक कैलास जाधव, तलाठी सुनील पवार  पोलीस पाटील अशोक चव्हाण, उदल पवार व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!