पाचोरा तालुक्यात जुगार अड्ड्यांवर धाड ; पावणे नऊ लाखांचा माल हस्तगत

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नगरदेवळा, आखतवाडे शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिस अधिक्षक प्रविण मुंढे यांच्या आदेशाने भडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अशोक उतेकर यांच्या नेतृत्वाखाली जळगाव येथिल एस. आर. पी प्लाटुन तुकडी व भडगाव पोलिस कर्मचार्‍यांच्या सहाय्याने छापा टाकला. या छाप्यात ७ लाख ५१ हजार रूपये किंमतीच्या ३१ मोटारसायकली सोबत १ लाख २१ हजार ५८० रूपये रोख व २१ आरोपी ताब्यात घेण्यात आले. 

या गोपनीय कारवाहित रोख रक्कमसह  मुद्देमालाची रक्कम ही ८ लाख १५ हजार ५७० रूपयांची कारवाही चकित करणारी आहे. या कारवाहीमुळे नगरदेवळा आऊटपोस्ट पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या कार्यप्रणालीबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. या कारवाही प्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असुन आरोपींना जामिनवर सोडण्यात आले असुन घटनास्थळी ताब्यात घेतलेली दहा हजार रूपये किंमतीचे एक ईन्व्हर्टर बॅटरी, ३१ मोटरसायकली नगरदेवळा आउऊटपोस्ट पोलिस स्टेशन ताब्यात ठेवल्या आहेत.

याबाबत पाचोरा पोलिस सुञांकडुन मिळालेली माहीती अशी की, १३ मे रोजी राञी भडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अशोक उतेकर यांना जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक प्रविण मुंढे यांनी फोन द्वारे नगरदेवळा ते आखतवाडे रस्त्यालगत काही नागरिक बेकायदेशीररित्या एकञ जमले असुन जुगार खेळत असल्याची गोपनीय माहीती प्राप्त झाली आहे. तुम्ही या ठिकाणावर छापा मारुन कारवाही करण्याचे आदेश दिले सोबत जळगाव येथुन आर. सी. पी. प्लाटुन तुकडी पाठवित असल्याचे कळविले. पोलिस निरिक्षक अशोक उतेकर यांनी लगेच भडगाव पोलिस स्टेशनला कर्तव्यावर असलेले पोलिस उपनिरिक्षक आनंद पटारे, पो. काॅ. ईश्वर पाटील, नितिन रावते व लक्ष्मण पाटील यांना कॅबिनला बोलवुन या कारवाहीची माहीती दिली व जळगाव येथुन येणार्‍या आर. सी. पी. प्लाटुनची वाट पाहत थांबले. राञी १२:१० वाजता पोलिस अधिक्षक यांनी पाठवलेली प्लाटुन व भडगाव येथील निवडक कर्मचारी घेऊन पोलिस निरिक्षक अशोक उतेकर यांनी घटनास्थळाकडे मार्गक्रमण केले. पोलिस अधिक्षक यांनी दिलेल्या माहीतीप्रमाणे त्या निंबुच्या बागेत लाईट लाऊन जुगार खेळला जात होता. तर शेताच्या बांधावर मोटारसायकली उभ्या करून ठेवल्या होत्या. अशोक उतेकर यांनी यावेळी दोन तुकड्यांमध्ये कर्मचारी विभागुन शेताच्या दोन बाजुंनी छापा टाकला.या छाप्यात २१ जण पोलिसांच्या ताब्यात आले तर काहीजण अंधाराचा फायदा घेउन पळुन जाण्यात यशस्वी झाले.यावेळी ताब्यात घेतलेल्या २१ जणांना नगरदेवळा आउटपोस्ट पोलिस स्टेशनला आणण्यात आले.सोबतच शेताच्या बांधावर असलेल्या ३१ मोटरसायकलीही पौलिस स्टेशनला आणल्या गेल्या.

या प्रकरणी २१ जणांविरुध्द भडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस काॅस्टेबल स्वप्निल बाळासाहेब चव्हाण यांच्या फिर्यादिनुसार भाग ०६ गु. र. नं. १८७/२१ महाराष्ट जुगार अॅक्ट कलम १२ (अ),भा. दं. वी. कलम १८८, २६९, २७० सह महा. पोलिस कायदा कलम ३७ (१) ३ चे उल्लंघन कलम १३५  प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे.या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक नलावडे हे करित आहेत.

या छाप्यात ज्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला त्यांची नावे पुढील प्रमाणे..

रमेश संभाजी बिरारी (वय – ३३ रा.  खाजोळा ३ हजार १०० रुपये ) हितेश बागुल पाटील ( वय – २२ रा. कजगाव ४ हजार २०० रुपये), संजय केशव पाटील ( वय – ५१ रा.  खाजोळा ७ हजार ३०० रुपये),

नरेंद्र किसन शिंदे (वय – ३४ रा. राममंदिर चौक, पारोळा २ हजार ५२० रुपये),सुनिल बाबुलाल शेलार (वय –  ४५ रा. टाकळी ६ हजार ४६० रुपये), भाऊसाहेब भानुदास मराठे (वय – ३२ रा. टाकळी ३ हजार ३३० रुपये), कन्हैय्या फकिरासिंग परदेशी (वय – ५० रा. नगरदेवळा २ हजार ५१० रुपये), रतन चिंधा पाटिल (वय – ६५ नगरदेवळा ३४ हजार रुपये), राहुल ईश्वर पाटील (वय – २४ रा. टाकळी ५ हजार ५०० रुपये), दिनेश प्रकाश भोई ( वय – ३२ रा. कजगाव ७ हजाय६५० रुपये), रविंद्र सर्जेराव पाटील (वय – २६ रा. भोरटेक ५ हजार २२० रुपये), नितिन गरबड शेळके ( वय -३० रा. टाकळी २ हजार ८१० रुपये), नवल ञ्यंबक महाजन (वय – ४२ रा. टाकळी ४ हजार ५०० रुपये), साबिरशाहा सुलेमानशाहा (वय – ३६ रा. आखतवाडे ३ हजार १५० रुपये), मनोज हिलाल महाजन (वय – २४ रा. कजगाव १ हजार ७५० रुपये), सोनुसिंग खुशाल पाटील (वय – ३० रा. खाजोळा ४ हजार ६०० रुपये), पंकज अरूण पाटील (वय – २९ रा. खाजोळा ३ हजार ४१० रुपये), संदिप तुकाराम साळुंखे (वय – २८ रा. टाकळी ३ हजार६०० रुपये), निंबा विठ्ठल नागणे (वय – ४० रा. भोरटेक २ हजार ७०० रुपये), अमोल वाल्मिक मुलमुले (वय – ३० रा. टाकळी १ हजार ६० रुपये), उज्जवल रमेश पाटील (वय – ३० रा.  खाजोळे २ हजार रुपये), या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या ३१ मोटरसायकली पुढील प्रमाणे.. कंसात दिलेली रक्कम अंदाजीत आहे… एम. एच. – १९ – ए. सी. – ४२३१  (हिरोहोंडा – विस हजार रुपये), एम. एच. – १९ – डी. ए. – ६५५७  (हिरो कंपनी – तीस हजार रुपये), एम. एच. – १९ – बी. पी. – ०७९१ (हिरोहोंडा – विस हजार रुपये), एम. एच. – १९ – बी. ई. – ८०७३ (बजाज – अठरा हजार रुपये), एम. एच. -१९ – बी. ए. – ३६४४ (बजाज – विस हजार रुपये), एम. एच.- १९ – ए. ए. – ४५०० (हिरोहोंडा – अठरा हजार रुपये), एम. एच.  – १९ – डी. एल. – ०८३९ (हिरो पंचविस – हजार रुपये), एम. एच. – १९ – ए. व्ही. – ४३२६  (हिरो – तीस हजार रुपये), एम. एच. – ०४ – इ. एम. – ५००२ (हिरोहोंडा –  विस हजार रुपये), एम. एच. – १९ – डी. ए. – ०८६७ (बजाज –  पंचविस हजार रुपये), एम. एच. – ०५ – ए. सी. – ४७९५  (हिरो – विस हजार रुपये), एम. एच. – १९ – सी.के. – ५४९८ ( बजाज – पस्तिस हजार रुपये), एम. एच. – १९ – सी. डी. – ३१८४ (होंडा – तीस हजार रुपये), एम. एच. – १९ – ए. टी. – ३८४०  (हिरोहोंडा –  विस हजार रुपये), एम. एच. – १९ – डी. बी.  – ४०३२  (होंडा – तिस हजार रुपये), एम. एच. – १९ – सी. सी. – ३८९७ (बजाज – विस हजार रुपये), एम. एच. – १९ – डी. एफ. – ०४९७ (हिरोहोंडा – विस हजार रुपये), एम. एच. – १९ – डी. एल. – ९४४०  (हिरो – पंचविस हजार रुपये), एम. एच. – १९ – बी. एच. – ५१३८  (टी. व्ही. एस. स्टार – विस हजार रुपये), एम. एच. – १५ – आर  – ५२९० (होंडा – तिस हजार रुपये), एम. एच. – १९ – सी. डी.  – ८५२९  (होंडा – तिस हजार रुपये),  एम. एच. – १९ – डी. ए.  – ८२२२ (हिरो – तीस हजार रुपये), एम. एच. – १९ – ए. यु. – ०८४९ (होंडा – विस हजार रुपये), एम. एच. – १९ – डी. एम. – ४३६४ (बजाज – विस हजार रुपये), एम. एच. – १९ – डी. एच.  – ६९१६ (होंडा – तीस हजार रुपये), एम. पी. – ६८ – एम. ई. – ४६३५ (होंडा – तीस हजार रुपये), एम. एच – १९ – सी. क्यु. – ५६६९ (हिरो पंचविस हजार रुपये), विना नंबरची सुझुकी मॅक्स १०० (विस हजार रुपये) याप्रमाणे ३१ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

 

Protected Content