
रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड एक्सलन्स अवॉर्डस् मुंबई २०२५-२६ हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा आज दि. ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी वाशी, नवी मुंबई येथील विश्णुदास भावे नाट्यगृहात पार पडला. यामध्ये रावेर शहरातील शिक्षक राहुल शिंदे यांना
“द बेस्ट टीचर अवॉर्ड” मुंबईत प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रम दरम्यान भारताच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आदरणीय किरण बेदी होत्या, तर ऑलिम्पिक पदक विजेत्या सायना नेहवाल यांची विशेष उपस्थिती लाभली.
या सोहळ्यात आपल्या शाळेच्या यशाचा मान वाढवणारी अभिमानास्पद कामगिरी झाली. शाळेच्या मुख्याध्यापिका एन. पी. पुराणिक यांना उत्कृष्ट शैक्षणिक कार्य, शाळेची सर्वांगीण प्रगती आणि गुणवत्तापूर्ण नेतृत्व यासाठी “द बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड” ने गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे शाळेतील कर्तव्यनिष्ठ व नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीसाठी प्रसिद्ध असणारे राहुल शिंदे यांना “द बेस्ट टीचर अवॉर्ड” प्रदान करण्यात आला. यावेळी राहुल शिंदे यांचे रावेर शहरातून अभिनंदन होत आहे.



