राहूल-प्रियंका गांधी अमेठी व रायबरेलीतून लोकसभा लढवणार नाही

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सध्या देशात सर्व पक्ष लोकसभा निवडणूकीची तयारी करत आहे. देशातील प्रत्येक राज्यात कुठला उमेदवार, कुठल्या जागेवरुन निवडणूक लढणार त्याची घोषणा प्रत्येक पक्ष जाहीर करत आहे आहे. त्याआधी गांधी कुटुंबाने मोठी घोषणा केली आहे. अमेठी आणि रायबरेली पारंपारिक मतदारसंघापासून गांधी कुटुंब लोकसभा लढवणार नाही आहे. राहुल आणि प्रियंका गांधी क्रमश: अमेठी आणि रायबरेली येथून निवडणूक लढवण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की ‘मी जर अमेठी आणि वायनाड या दोन्ही जागांवरुन लोकसभेची निवडणूक लढवली, या दोन्ही ठिकाणहून निवडणूक जिंकल्यास एकजागा सोडावी लागेल. यातून लोकांमध्ये चुकीचा संदेश होईल’ अमेठी सोडल्यास लोक म्हणतील, यावेळी विजयी केलं, तर आम्हाला सोडून जातोय आणि वायनाड सोडल्यास लोक म्हणतील अमेठीमधून हरल्यानंतर आम्ही संसदेत पाठवलं, तर आता अमेठीमधून जिंकल्यानंतर आम्हाला सोडून दिलं’ म्हणून राहुल गांधी वायनाडमधूनच निवडणूक लढणार आहेत.

दुसरीकडे प्रियंका गांधी यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला. रायबरेलीच नाही, दुसऱ्या कुठल्याही मतदारसंघातून त्या निवडणूक लढणार नाहीत प्रियंका गांधी असं म्हणतात, एकाच कुटुंबातील तीन सदस्य संसदेत गेले, तर जनतेमध्ये चुकीचा संदेश दिला जाईल तसेच भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र परिवारवादाचा आरोप लावतात. त्यावर शिक्कामोर्तब होईल. त्यांचे आरोप योग्य ठरतील. राहुल गांधी बहिण प्रियंका गांधीशी सहमत आहेत. त्यामुळे दोन्ही बहिणभाऊंनी अमेठी आणि रायबरेली येथून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Protected Content