राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम

rahul gandhi

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव मांडल्यापासून, पक्षापुढे महापेच निर्माण झाले आहे. कारण राहुल गांधी आपल्या राजीनाम्यावर ठाम असून काँग्रेसचा नवीन अध्यक्ष कोण? असा महापेच पक्षाला पडला आहे.

 

राहुल गांधी हे सोमवारी, तिसऱ्या दिवशीही राजीनाम्यावर ठाम होते. तर दुसरीकडे कर्नाटक व राजस्थान या दोन राज्यांतील काँग्रेसची सत्ता धोक्यात येते की काय? अशी चिंता नेत्यांना भेडसावू लागली आहे. काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर झालेल्या पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देऊ केला, मात्र कार्यकारिणीने तो अमान्य केला. तरीही राहुल पद सोडण्याबाबत कमालीचे आग्रही आहेत. त्यामुळे पक्षात संभ्रमावस्था असताना कर्नाटकमधील काँग्रेस सरकार पाडण्याबाबत कॉंग्रेसचेच आमदार पुढाकार घेत असल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे राजस्थान काँग्रेसमध्येही अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पक्षापेक्षा आपल्या मुलाच्या निवडणुकीसाठीच जोर लावल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, या पराभवाची जबाबदारी निश्चित करून संबंधित नेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी राज्यातील अनेक मंत्रीच करू लागले आहेत.

Add Comment

Protected Content