मोटेरा स्टेडियम उभारणाऱ्या व्यक्तीलाच ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमाचे आमंत्रण नाही

motera21

 

अहमदाबाद (वृत्तसंस्था) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज अहमदामध्ये जगातील सर्वात मोठे स्टेडियमचे उद्घाटन करत आहेत. परंतू ज्यांनी हे स्टेडियम ज्यांनी बांधले, त्या मृगेश जयकृष्ण यांनाच ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमाच्या आयोजकांनी निमंत्रण दिले नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. आज मोटेरा स्टेडियमवर ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, मोटेरा स्टेडियमची ज्यांनी उभारणी त्यांनाच या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले नाही. ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमाला मला आमंत्रित करण्यात आले नाही. मात्र, मोटेराला जगातील सर्वात मोठे स्टेडियम बनताना पाहून घेतलेला आनंद इतर कोणत्याही भावनांपेक्षा जास्त आहे, असे मृगेश जयकृष्ण यांनी म्हटले आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या स्टेडियममध्ये एक लाख १० हजार प्रेक्षकांना सामावून घेण्याची क्षमता आहे. हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम असल्याचा दावा करण्यात येतो.

Protected Content