टीकाकार मीडियाचा गळा घोटण्यासाठी मोदी सरकारला शुभेच्छा : राहुल गांधी

rahul modi 759

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोणतेही विकास कामे न करता १०० दिवस पूर्ण केल्याबद्दल तसेच टीकाकार मीडियाचा गळा घोटण्यासाठी मोदी सरकारला शुभेच्छा , अशी उपहासात्मक टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दुसऱ्या टर्मचे १०० दिवस आज पूर्ण केल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्वीटरवरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटलेय की, १०० दिवस कोणतीही विकासकामं न करता सतत लोकशाहीवर हल्ला करण्यासाठी, टीकाकार मीडियाचा गळा घोटण्यासाठी मोदी सरकारला शुभेच्छा. स्पष्ट नेतृत्त्वाची कमी, आर्थिक विकासाचा मंदावलेला वेग अशा परिस्थितीत अर्थव्यवस्थेत सुधार आणण्यासाठी सरकारकडे योग्य दिशा आणि उपाययोजनांची कमी आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनेही मोदी सरकारने 100 दिवस पूर्ण केल्यानंतर सोशल मीडियावरुन सरकारवर हल्लाबोल केला. सरकारवर टीका करताना काँग्रेसने हुकूमशाही, अनागोंदी आणि अराजकता या तीन शब्दांचा वापर केला आहे.

Protected Content