रहाणे सोडणार राजस्थान रॉयल्सची साथ

ajinkya rahane

मुंबई वृत्तसंस्था । भारतीय टेस्ट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आगामी इंडियन प्रेमिअर लीग (आयपीएल) मध्ये राजस्थान रॉयल्स संघाची साथ सोडत दिल्ली कॅपिटल्स संघात शामिल होण्यासाठी सज्ज झाला आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विन दिल्ली कॅपिटल्सशी जुडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष रहाणेवर लागून आहे.

राजस्थानने रहाणेच्या बदली पत्रावर स्वाक्षरी केली असून त्याला दिल्ली कॅपिटल्स संघाकडे पाठवण्यात आले. यानंतर राजस्थान फ्रँचायझीनेही या प्रक्रियेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल आणि बीसीसीआय यांना त्यांची संमती पाठविली आहे. गुरुवारी, आयपीएलची ट्रेड विंडो बंद होईल आणि त्यानंतर फ्रँचायझींमध्ये कोणत्याही खेळाडूची अदला-बदल होऊ शकणार नाही. रहाणेची किंमत 4 कोटी आहे. रहाणेच्या बदल्यात रॉयल्सला दिल्ली कॅपिटलचे दोन खेळाडू मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. रहाणेला शामिल करण्यासाठी आणि त्याच्या फलंदाजीला अजून मजबूत करण्यासाठी दिल्ली काही महिन्यांपासून रॉयल्सशी चर्चा करीत होती. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली हे गेल्या हंगामात दिल्लीचे सल्लागार होते आणि रहाणेसारखा अनुभवी खेळाडूने त्याच्या संघात असावा अशी त्यांची इच्छा होती. दरम्यान, या महिन्याच्या 8 तारखेला, दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या पुढच्या आवृत्तीत ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन याच्या संघात शामिल होण्याची अधिकृतपणे घोषणा केली होती. अश्विन शेवटच्या दोन सत्रात पंजाबकडून खेळत होता आणि त्या संघाचा कर्णधारही होता.

Protected Content