दिल्लीत पंतप्रधान मोदींची धन्यवाद रॅलीचे आयोजन

prime minister narendra modi in mandsaur 3ad53cac f059 11e8 86fe bb1c4000c468

नवी दिल्ली वृत्तसंस्था । केंद्र सरकारने दिल्लीतील 1 हजार 734 अवैध वसाहती नियमित केल्या आहेत. याबाबत आज रविवार 22 डिसेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देण्यासाठी रामलीला मैदानावर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये लाखोंच्या संख्येने लोक येतील, असा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे.

दिल्लीत अवैध वसाहतींना नियमित केल्याने जवळपास 40 लाख लोकांना त्यांचा मालकी हक्क मिळणार आहे. या रॅलीमध्ये 7 खासदार, 281 मंडळाचे अध्यक्ष, नगरसेवक आणि इतर कार्यकर्त्यांवर समर्थकांना जमवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या रॅलीच्या माध्यमातून भाजप दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात करणार अशी माहिती आहे. त्यासाठी ही वातावारण निर्मिती असल्याचं बोललं जात आहे.

काही दहशतवादी गट रामलीला मैदानावर होणाऱ्या रॅलीदरम्यान पंतप्रधानांना लक्ष्य करु शकतात, अशी माहिती आहे. याप्रकरणी गुप्तचर संस्थांनी विशेष संरक्षण गट आणि दिल्ली पोलिसांना माहिती दिली आहे. केंद्रीय संस्थांनी सुरक्षा व्यवस्था आणखी कडक केली आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी ब्ल्यू बुकमध्ये असलेल्या सूचना पूर्णपणे अंमलात आणण्याच्या सूचना सुरक्षा संस्थांना देण्यात आल्या आहेत.

रामलीला मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्यासाठी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांना देशात एकत्र करण्यात आले आहे, अशी माहिती गुप्तचर संस्थांनी दिली. त्यामुळे रामलिला मैदानावर पोलीसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Protected Content