ठाण्यात राडा : आरपीआय कार्यकर्ताने ईव्हीएमवर फेकली शाई

Thane Ink on EVM Sunil Khambe

 

ठाणे वृत्तसंस्था । राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे मतदान सुरु असून ठाण्यात ईव्हीएमवर शाई फेकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे मतदान केंद्रात एकच गोंधळ उडाला आहे.

याबाबत सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, रिपब्लिकन कार्यकर्ते सुनिल खांबे यांनी मतदानासाठी मतदान केंद्रावर आले असता निवडणूक कर्मचाऱ्यांकडील शाई बॉटल हिसकावत ईव्हीएमवर फेकली. यावेळी मतदान केंद्रात एकच गोंधळ उडाला. ईव्हीएममुळे लोकशाही धोक्यात आली आहे. सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएमच्या मदतीने विरोधी पक्षातील मित्रपक्षांना संपवले आहे. “मला फासावर लटकवले तरी चालेल, पण मी ईव्हीएमचा विरोध करत राहणार”, असे मत सुनिल खांबे यांनी व्यक्त केले आहे. तसेच खांबे यांनी शाई फेकत “ईव्हीएम मुर्दाबाद”च्या घोषणाही देत लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी ईव्हीएमला विरोध करावा, असे आवाहन केले आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत खांबे यांना मतदान केंद्राबाहेर काढत ताब्यात घेतले.

Protected Content