पहूर, ता. जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील आर. टी. लेले विद्यालयाने नुकत्याच झालेल्या चित्रकला स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग कला संचानालय महाराष्ट्र राज्य शासकीय ग्रेड एलिमेंटरी २०२२ -२३ परीक्षा चा निकाल जाहीर झाला आहे. यात सलग सोळाव्या वर्षी १००% लागला आहे . यामुळे विद्यार्थी व शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे . एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत ’ ए ’ ग्रेड मध्ये , १६ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यात जान्हवी महेंद्र बनकर, राजश्री कैलास बनकर, तानेश योगेश बनकर, राधिका रवींद्र बोरसे, रामेश्वर एकनाथ भडांगे, तनुश्री गोरख चौधरी, वैशाली श्रीकृष्ण द्राक्षे, हर्षल श्रीकृष्ण घोंगडे, नकिता पुंडलिक घोंगडे, विशाल दिनकर घोंगडे सिद्धी भगवान जाधव, संचिता रंगनाथ जाधव, प्रीतम दिलीप महाजन, उदय अरुण पन्ह्यार, प्रणव सुनील सपकाळ आणि विजय दिलीप सोनवणे यांचा समावेश आहे.
तसेच बी ’ ग्रेड मध्ये कमलेश जगदीश पांडव, निखिल उत्तम पांडव व सारोश जितेंद्र सुरळकर यांनी यश संपादन केले. या सर्व विद्यार्थ्यांना कलाशिक्षक गोरे डी .वाय .यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन माननीय गिरीश महाजन , व्हाईस चेअरमन साहेबराव देशमुख, सचिव डॉक्टर अनिकेत लेले, किशोर पाटील वरिष्ठ लिपिक तसेच शाळेचे मुख्याध्यापक आर. बी .पाटील पर्यवेक्षक , एस. व्ही. पाटील सर तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.