मुक्ताईनगरात कुरेशी समाजबांधवांची बैठक

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी बकरी ईदच्या पार्श्‍वभूमिवर येथील पोलीस स्थानकामध्ये कुरेशी समाजबांधवांची बैठक घेण्यात आली.

आगामी बकरी ईद अनुषंगाने मुक्ताईनगर पोस्टे हद्दीतील कुरेशी समाजाची काल सायंकाळी मीटिंग घेण्यात आली. या बैठकीला सपोनि तथा विद्यमान प्रभारी संदीप दुनगहू यांनी उपस्थितांना आवश्यक त्या सूचना दिल्यात. यात प्रमुख्याने आगामी सणाच्या कालावधीत
कोणत्याही घटनांमुळे सामाजिक तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी व शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे असे सांगण्यात आले.

दरम्यान, राज्यात दिनांक ४ मार्च २०१५ पासून महाराष्ट्र प्राणी रक्षण कायदा १९९५ अन्वये लागू करण्यात आलेला आहे. या सुधारित अधिनियमाप्रमाणे कुठलेही गोवंश जातीचे जनावरांची कत्तल करण्यास सक्त मनाई असल्याने याचे पालन करण्याचे निर्देश याप्रसंगी देण्यात आले. तसेच मुक्ताईनगर येथील नागरिकांनी कोणीही कोणत्याही समाजाच्या भावना दुखावतील असे सोशल मीडियावर संदेश अगर स्टेटस ठेवणार नाहीत, याबाबत सूचना देण्यात येवुन सीआरपीसी १४९ प्रमाणे नोटिसची बजावणी करण्यात आलेली आहे.

Protected Content