राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी जिल्हा प्रतिनिधीची निवड त्वरीत करा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । पंचविसावा राष्ट्रीय युवा महोत्सव पांडेचेरी येथे होत आहे. यासाठी जळगाव जिल्ह्याने देखील याचे नियोजन करून जिल्हा प्रतिनिधीची तातडीने निवड करावी अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षीत यांना निवेदन करण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशात दरवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा पांडेचेरी येथे १२ ते १६ जानेवारी दरम्यान राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रतिनिधी प्रतियोगिता निवड चाचणी संदर्भात कोणतेही नियोजन करण्यात आलेली नाही. तसेच प्रतियोगिता निवड चाचणी करण्यासंदर्भात वरिष्ठांकडून आदेश आलेले नसल्याची माहिती समोर आली. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या वतीने ताडतीने राष्ट्रीय युवा महोत्सवात जळगाव जिल्ह्यातील प्रतिनिधी सहभागी व्हावा यासाठी लवकरात लवकर प्रतियोगिता निवड चाचणी घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन बुधवारी २२ डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षीत यांना देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सांस्कृतीक विभागाचे सल्लागार रमेश भोळे, कलावंत सुदर्शन पाटील, अजय शिंदे, आकाश बाविस्कर, जिल्हा अध्यक्ष गौरव लवंगले यांच्यासह आदींनी निवेदन दिले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/284273097079881

 

Protected Content