पोहण्यासाठी गेलेल्या तरूणाचा तापी नदीत बुडून मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । तापी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरूणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. पट्टीच्या पोहणार्‍या मच्छीमारांनी बुडालेल्या अजयचा मृतदेह शोधून काढला. यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. याप्रकरणी तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, अजय मुरलीधर पाटील (वय-२२) रा. सावखेडा खुर्द (किनोद) ता.जि.जळगाव ह.मु. देवराम हा नुतन मराठा महाविद्यालयात बी.एस्सी.चे शिक्षण घेत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर सुट्या असल्याने आई-वडीलांसोबत मुळगाव कनोद जवळी सावखेडा येथे गेले होते. याठिकाणी अजय हा त्याच्या मित्रांसमवेत तापीनदीत पोहायला गेला. पोहत असतांना अचानक अजय खोल पाण्यात बुडाला. भितीने मित्र नदीपात्रातून काठावर आले व आरडाओरड करायला लागले. याठिकाणी असलेल्या मच्छीमारांनी अजयचा मृतदेह बाहेर काढला. याबाबत माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळ गाठले व मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. अजयचे वडील धामगणाव येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत. मोठा भाऊ अमोल हा शिंदखेडा येथे सार्वजनिक बांधकाम विभागात उपअभियंता आहे. अजयच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहा. फौजदार लावसिंग पाटील हे करीत आहेत.

Protected Content