पारोळा येथील अवैध धंद्यांवर त्वरीत आळा घाला; शिवसेनेची मागणी

पारोळा प्रतिनिधी । गेल्या काही महिन्यांपासून पारोळा शहरासह ग्रामीण भागात चोरी, अवैध धंदे, तस्करी आणि अवैध दारूची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असून याकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. पारोळा शिवसेनेचे अशोक मराठे यांनी तहसीलदार अनिल गावंडे आणि पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांच्याकडे त्वरित कारवाईसाठी लेखी तक्रार केली आहे.

यावेळी युवासेना शहरप्रमुख आबा महाजन, उपशहरप्रमुख सावन शिंपी, बाळु पाटील, पंकज मराठे, नाना सोनवणे, कुंदन पाटील, संतोष महाजन हे उपस्थित होते. शहरासह ग्रामिण भागात रोख रकमेसह वाहनचोरी, दरोडा, सट्टे-पत्ते, महामार्गावर वाहनांमधुन लोखंड, सिमेंट, इंधन, गॕस इत्यादी वस्तुंची होत असलेली तस्करी, अवैधपणे दारू विक्री खुप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. हे सर्व प्रशासनाचा नजरेत होत असुन देखील प्रशासन मात्र कुठलीही कार्यवाही करतांना दिसत नाही. यामुळे जनमाणसात भितीचे वातावरण पसरलेले आहे. तसेच अवैध दारू विक्री ही महिलांसाठी व नागरीकांसाठी रहदारी असणाऱ्या रस्यावर केली जाते. याचे चित्र तुम्हाला बस स्टँण्ड पाठीमागील बोगद्याकडे पाहावयास मिळेल. यामुळे महिलांना देखील सदर रस्त्याने वावरणे जिक्रीचे झालेले आहे. तरूण मुल देखिल व्यसनांचा आहारी जात आहेत. त्यामुळे या सर्व बाबींवर बारकाईने लक्ष देवून कडक कार्यवाही करण्यात यावी तसेच यावर त्वरीत आळा बसावा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असे शिवसेना प्रमुख अशोक मराठे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे .

 

Protected Content