चाळीसगावला मुख्याधिकारी न मिळाल्यास मंत्रालयाच्या पायरीवर उपोषण- खा. उन्मेष पाटील

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव नगरपालिकेला एक वर्षापासून मुख्याधिकारी नसल्याने विकासकामे खोळंबली आहेत. या अनुषंगाने लवकरात लवकर मुख्याधिकार्‍यांची नियुक्ती न केल्यास आपण मंत्रालयाच्या पायरीवर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा आज खासदार उन्मेषदादा पाटील यांनी दिला आहे.

याबाबत वृत्त असे की,येथे नगरोत्थान योजनेत ९० कोटी,१५० कोटींच्या महत्वाकांक्षी भुयारी गटार योजनेतील पहिल्या टप्प्यातील ७० कोटी, २२ कोटींचा घनकचरा प्रकल्प याच बरोबर कोट्यावधीरुपयांची शहर सुशोभीकरण, एलइडी विद्युत दिवे योजना अशा अनेक योजनेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून मोठा निधी आणून शहराच्या विकासाला गती देण्याचे काम सुरू असतांना गेल्या बारा महिन्यापासून चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पद रिक्त असल्याने शहरवासीयांची कामे खोळंबली आहेत. तर विकास कामांची गती मंदावली असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमिवर आज नगर सचिवांना भेटून येत्या चोवीस तासात मुख्याधिकारी नेमणूक न झाल्यास मंत्रालयाच्या पायरीवर उपोषणाचा इशारा दिला असल्याची माहिती आज मुुंबईत खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिला आहे.

यंत्रणा खडबडून जागी

चाळीसगाव येथे गेल्या वर्षभरापासून मुख्याधिकारी नसल्याने ही कामे खोळंबली आहेत तसेच नागरिकांचा रोष देखील वाढत असून आज मुंबईत नगर विकास सचिव यांची भेट घेऊन दोन दिवसात पालिकेवर मुख्याधिकार्यांची नेमणूक न झाल्यास मंत्रालयाच्या पायरीवर उपोषणाचा इशारा दिला आहे. अशी माहिती मुंबई येथून उन्मेषदादा पाटील यांनी दिली आहे. यामुळे मंत्रालयातील यंत्रणा खडबडून जागी झाल्याचे दिसून आले आहे.

लवकरच होणार नियुक्ती

दरम्यान, खासदार उन्मेषदादा पाटील यांनी खंबीर पवित्रा घेतल्याने शासन खडबडून जागे झाले असून येत्या दोन दिवसात मुख्याधिकार्‍यांची नियुक्ती होईल अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. तर मुख्याधिकारी न मिळाल्यास आपण मंत्रालयाच्या पायर्‍यांवर उपोषण करणार असल्याचा इशारा उन्मेषदादांनी दिला आहे. परिणामी याबाबत राज्य सरकार तातडीने निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

खालील व्हिडीओत पहा खा. उन्मेष पाटील नेमके काय म्हणालेत ते ?

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/277026113586765

Protected Content