अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील नागरिकांसाठी एक अभिनव आणि आरोग्यदायी सुविधा म्हणून ‘श्री मंगल जल सेवा’चा भव्य शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समिती, धुळे रोड येथे माजी नगराध्यक्षा तथा माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
मंगळ ग्रह संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले व ज्येष्ठ पत्रकार राजकुमार छाजेड यांनी या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गोविंदादा मुंदडे, मोहनशेठ ओस्तवाल, बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील, अर्बन बँकेचे संचालक प्रवीण जैन व समाधान धनगर, डॉ. किशोर शहा, प्रा. के. डी. पाटील आणि खानदेश शिक्षण मंडळाचे संचालक हरी भिका वाणी यांनी आपली उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणात डॉ. डिगंबर महाले यांनी सांगितले की, लवकरच मंगळग्रह सेवा संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती, शहरातील व्यापारी आणि राजकीय नेते यांच्या एकत्रित प्रयत्नातून शहरवासियांसाठी अल्प दरात दर्जेदार चहा, नाश्ता व जेवणाची सोय उपलब्ध करून दिली जाईल. यासोबतच, गरजूंना वाजवी दरात घरपोच डबा सेवा देखील पुरवली जाणार आहे.
या उदघाटन सोहळ्याला अर्बन बँकेचे चेअरमन पंकज मुंदडे, संचालक प्रवीण जैन, खा.शि. मंडळ संचालक योगेश मुंदडे, आदर्श फोटोजचे संचालक हेमंत पवार, सुंदरपट्टीचे माजी सरपंच सुरेश पाटील, शरद सोनवणे, जितेंद्र जैन, प्रदीप अग्रवाल, प्रीतपालसिंग बग्गा, प्रशांत सिंघवी, प्रसन्ना जैन, प्रीतम मणियार, अनिल रायसोनी, डॉ. किशोर शहा, अनिल कदम, विशाल शर्मा, मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, मंगल सेवेकरी डी. ए. सोनवणे, आनंद महाले, पुषंद ढाके, व्ही. व्ही. कुलकर्णी आणि व्हॉईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.