यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त यावल येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध साप्ताहिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमांतर्गत भाजपा यावल मंडळच्या वतीने पाडळसा येथील भिल्लट बाबा देवस्थान येथे मंदिर परिसर स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अभियानांतर्गत साफसफाई करून महाआरतीचेही आयोजन करण्यात आले होते.
राणी अहिल्यादेवी होळकर (१७२५-९५) या एक महान मराठा राज्यकर्ती आणि समाजसुधारक होत्या. त्यांच्या प्रशासकीय कार्यकुशलतेसाठी आणि सामाजिक कार्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपल्या शासनकाळात संपूर्ण देशात विविध ठिकाणी हिंदू मंदिरे आणि नदीघाट बांधले, तसेच लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी औद्योगिक धोरण आखत प्रसिद्ध हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला.
या कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, भारतीय जनता पक्षाचे यावल तालुका सरचिटणीस विलास चौधरी, भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष सागर कोळी यांच्यासह भरत पाटील, पूनम पाटील, गोलू पाटील, कैलास सपकाळे, नितीन सपकाळे, नितीन तायडे, बापू कोळी यांच्यासह महिला व ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून या पवित्र कार्यात आपला सहभाग नोंदवला.