पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर सहा महिन्याकरीता निर्बंध

pmc bank

पुणे प्रतिनिधी । रिझर्व्ह बँकेने मुंबईस्थित पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध घातले आहेत. त्यानुसार बँक कर्ज देणे, ठेवी स्वीकारणे यासह अनेक गोष्टींवर निर्बंध असतील म्हणून खातेदारांना केवळ एक हजार रुपये काढू शकतील. बँकेची सद्यस्थिती लक्षात घेता नागरिकांच्या हितासाठी बँकेवर निर्बंध लादणे आवश्यक होते, असे आरबीआयने आदेशात म्हटले आहे

आदेशात म्हटले आहे की, २३ सप्टेंबर पासून बँकेने रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेशिवाय कोणतेही नवे कर्ज देऊ नये, जुन्या कर्जांचे नूतनीकरण करू नये, बँकेने कोणतीही गुंतवणूक करू नये, तसेच नव्या ठेवी स्वीकारू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर बँकेची देणी फेडण्यासाठी देयक अदा करू नये. आणि निर्बंधाच्या काळात बँकेच्या ठेवीदारांना आपल्या सर्व प्रकारच्या खात्यांमधून केवळ एक हजार रुपयेच काढता येतील. मात्र, हा ठेवीदार बँकेचा कोणत्याही प्रकारचा देणेकरी असल्यास किंवा कर्जाचा हमीदार असल्यास ही रक्कम कर्ज खात्यात जमा होईल. ठेवीदारांच्या ठेवीची मुदत संपत असल्यास ही ठेव त्याच व्यक्तीच्या नावाने व त्याच व्याजदराने पुन्हा गुंतवता येईल. असे या आदेशात म्हटले आहे.

Protected Content