पुनगावातील पादचारी रस्तावरील मुरुमची चोरी ; कारवाईची मागणी

padachari

 

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील पुनगाव ग्राम पंचायत हद्दीतील पाडंव नगरी येथे पुनगाव ग्राम पंचायतीने पाचोरा तालुका पाटबंधारे विभागाच्या अंतुर्ली ते पुनगाव जाणा-या पादचारी रस्ता खोदून त्यावर मुरुम टाकण्यात आला होता. मात्र विना परवानगीने त्या मुरुमची उचल करण्यात येत आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पुनगाव ग्राम पंचायतीकडून पाट बंधारे विभागाच्या पाटचारीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. जसे पुनगाव ग्राम पंचायत हद्दीतील पाडंव नगरी येथे पुनगाव ग्राम पंचायतीने पाचोरा तालुका पाटबंधारे विभागाच्या अंतुर्ली ते पुनगाव जाणा-या पादचारी खोदून तेथिल मुरूमाची मोठ्या प्रमाणात उचल करण्यात येत आहे. पाडंव नगरीतील रस्त्यांवर टाकून महसुल विभागाचा महसूल बुडवून तसेच विनापरवानगी मुरूमाची उचल केली जात आहे. म्हणून संबधित ग्राम पंचायतीवर तसेच ग्राम पंचायतीच्या मुरूम खोदाई करणा-या अशासकीय कर्मचा-यांवर कडक कारवाई करण्यात यावी, आणि मुरूमाची चलनाव्दारे रॉयल्टी वसुल करण्याची मागणी जनतेतून करण्यात येत आहे.

Protected Content