चोपडा येथे आदिवासी विकास विद्यार्थी परीषदेतर्फे तहसीलदारांना निवेदन

chopada nivedan

चोपडा, प्रतिनिधी | येथे तहसीलदार अनिल गावित यांना शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहातील प्रवेशाची जिल्हा व तालुका स्तरावरील यादी त्वरित प्रसिद्ध करावी, याबाबत बुधवारी निवेदन देण्यात आले. तसेच आदिवासी विद्यार्थ्यांच्या अन्य समस्यांबाबत तीव्र आंदोलन केले जाईल. असा इशाराही यावेळी देण्यात आला.

 

निवेदन देताना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष दारासिंग पावरा जिल्हा सचिव संजय पाडवी, जिल्हा युवा सचिव राजेश बारेला ग्रामीण तालुका अध्यक्ष नामसिंग पावरा, तालुका उपसचिव आदेश पावरा महेंद्र पावरा, पवन पावरा, प्रा.जेकराम बारेला, रविंद्र पावरा, सुनील पावरा, रविंद्र बारेला, प्रदिप पावरा, विनोद पावरा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

इयत्ता ८ वी ते ११ वी च्या विद्यार्थी व विद्यार्थीनीच्या जिल्हा व तालुका स्तरावरील वसतिगृहांची प्रवेश यादी तात्काळ लावण्यात यावी, शासनाच्या जीआरनुसार सोयी-सुविधा पुरवण्यात याव्या व वसतिगृहातील विद्यार्थी व विद्यार्थीनीचे बाकी असलेले डी.बी.टी,निर्वाह भत्ता त्वरित देण्यात यावा. अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

Protected Content