कुऱ्हा महाविद्यालयात तेजोमय नियतकालिकाचे प्रकाशन

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | स्थानिक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कुऱ्हा काकोडा येथे तेजोमय नियतकालिक अंकाचे शैक्षणिक वर्ष २०२२- २३ चे नियतकालिक प्रकाशित करण्यात आले. नियतकालिकाचे प्रकाशन प. पू. माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी सार्वजनिक संस्था, कुऱ्हाचे कोषाध्यक्ष पुरणमलजी चौधरी, सचिव भालचंद्रजी कुलकर्णी, संचालक प्रल्हादजी बढे  यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पुरणमलजी चौधरी यांनी मनोगतामध्ये उत्कृष्ट नियतकालिक तयार करण्याचे श्रेय संपादक मंडळ आणि विद्यार्थी यांचे आहे असे सांगितले. सुंदर, सुबक, रेखीव व आकर्षक असे नियतकालिक तयार झाले त्याबद्दल त्यांनी संपादक मंडळाचे कौतुक केले. नियतकालिक म्हणजे महाविद्यालयाचा आरसा होय. नियतकालिकामध्ये विद्यार्थ्यांचे लेख, कविता, निबंध, चारोळ्या व उपक्रम इत्यादी प्रकाशित करण्यात आले आहे. नियतकालिकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील लेखन व सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालय प्रयत्न करीत असते त्याकरिता संस्था म्हणून भक्कमपणे अशा उपक्रमांच्या पाठीमागे आम्ही उभे राहू असे प्रतिपादन केले.

यावेळी प्रा. सचिन जोशी यांनी आपण वर्षभर जे विद्यार्थी केंद्रित उपक्रम राबवत असतो त्या कार्यक्रमाचा संपूर्ण आढावा या नियतकालिकामध्ये आहे. सर्व समावेशक नियतकालिक तयार करण्याचे श्रेय संपादक मंडळाचे आहे असे त्यांनी मनोगतामध्ये सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतिक शेमरे  यांनी केले. प्रकाशन कार्यक्रमाला नियतकालिक संपादक मंडळ, सर्व विभागाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. नयना सुरळकर यांनी केले.

Protected Content