Home करियर वैद्यकीय शिक्षणासाठी दिशाचा प्रवेश निश्चित; शाळेकडून अभिनंदन

वैद्यकीय शिक्षणासाठी दिशाचा प्रवेश निश्चित; शाळेकडून अभिनंदन

0
109

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील महावीर पब्लिक स्कूलची विद्यार्थींनी तथा ज्येष्ठ पत्रकार शांताराम लाठे व रविंद्र लाठे यांची पुतणी दिशा देवीदास लाठे हीचा बीएचएमएस महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याने परिवारासह शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

तिला जामनेर तालुक्यातील पळसखेडा येथील प्रकाशचंद जैन कॉलेजात बीएचएमएस या वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला आहे. त्याबद्दल महावीर पब्लिक स्कूल च्या वतीने अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी महावीर पब्लिक स्कूल शाळेचे अध्यक्ष प्रदीप लोढा, सचिव दीपक लोढा, प्राचार्या सौ. कुलकर्णी, कंडारे, नेमाडे, चव्हाण, असिफ, लाड, आजोबा विलास सावतडकर, आई दिपा देविदास लाठे उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound