खंडणी प्रकरणी दोघे अटकेत

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दत्तक पत्र व नावे केलेले शेत जमिनीचे कागदपत्र खोटे बनविण्याचे सांगत एक लाख रूपयांची मागणी केल्यावरून दोघांना अटक करण्यात आली आहे.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की ,येथील शहरातील पूर्णवाद नगरातील रहिवासी इरफान इस्माईल तडवी यांच्या पत्नीचे दत्तक प्रकरण व तिचे नावे दत्तक वडिलांनी करून दिलेले शेतीचे प्रकरण खोटे व गंभीर असल्याचे सांगत व ते प्रकरण दाबण्यासाठी येथील सुरेश पाटील व विरावली येथील संजय उत्तम पाटील एक लाख रुपयाची खंडणी मागितल्याची फिर्यादी इस्माईल तडवी यांनी दिलेल्या दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

याबाबत येथील पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार येथील पूर्णवाद नगरातील रहिवासी इरफान इस्माईल तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माझी पत्नी परविन हिस सुभान अमीर तडवी यांना मुलगा नसल्याने त्यांच्या साळूची मुलगी तथा माझी पत्नी परविन हिस दत्तक घेतले त्यानंतर बर्‍याच वर्षानंतर त्यांनी ३०जुलै २१ रोजी तहसीलदार यांचे कार्यालयात त्यांची यावल शिवारातील शेत गट नंबर २२८३ क्षेत्र दोन हेक्टर ०२आर ही सुभान तडवी यांचे नावे असलेली शेत जमीन त्यांची दत्तक मुलगी तथा माझी पत्नी परविन हीस नातेवाईक व पंच मंडळी समक्ष दत्तक घेत तहसीलदार यांचे कडे अधिनियम १९६६ ते कलम ८५ नुसार नुसार कुटुंब वाटणी पत्र तयार केले व परविन हिस ७/१२ मध्ये समाविष्ट केले. १ जानेवारी २३ रोजी, आठ वाजेचे सुमारास इरफान तडवी यांचा मोबाईल फोन क्रमांक ९८९००३८१३७ वर येथील संजय उत्तम पाटील यांचे यावल येथे असलेले मोटर गॅरेज वर गॅरेज चालक संजय पाटील व पत्रकार सुरेश पाटील यांनी इरफान तडवी यांना बोलावले.

तुझ्या पत्नीचे दत्तक प्रकरण व शेतजमिनीचे प्रकरण माहीत झाले आहे , हे प्रकरण मी बाहेर काढेल असे सुरेश पाटील यांनी सांगत तुझ्या पत्नीला ,सासर्‍याला ,व तहसीलदार यांना महागात पडेल हे प्रकरण दाबण्यासाठी एक जानेवारी ते ९ जानेवारी दरम्यान वेळोवेळी मोबाईलवर फोन करून एक लाख रुपयाची मागणी केली एकदम एक लाख रुपये जमत नसतील अन्यथा बातमी छापून तुझी बदनामी करेल अशी धमकी दिली आहे अशा आशयाच्या फिर्यादीवरून येथील पत्रकार सुरेश पाटील व संजय उत्तम पाटील यांची विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, या संदर्भात सुरेश पाटील म्हणाले की, दत्तक प्रकरण व शेतीचे प्रकरणाची माहिती माहिती अधिकारात मागितल्याने इरफान तडवी यांना रा आल्याने ही फिर्याद दाखल केली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content