यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने मालोद व आडगांव या गावांमध्ये जुन महिना हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा करण्यात आला.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.तुषार देशमुख, यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजू तडवी वैद्यकीय अधिकारी डॉ. दर्शना निकम, डाँ.तरन्नुम शेख व तालुका आरोग्य पर्यवेक्षक विजय नेमाडे यांच्या मार्गदर्शनानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव अंतर्गत उपकेंद्र मालोद व आडगांव येथे दरवर्षी जून महिना हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा करण्यात आला.
नागरिकांमध्ये हिवताप, डेंग्यू आजारांविषयी लक्षणे व उपाययोजना या बाबत जनजागृती करण्यात येते. यावर्षी तालुका आरोग्य पर्यवेक्षक विजय नेमाडे यांनी मालोद व आडगांव येथे प्रत्यक्ष भेट देऊन हिवताप व डेंग्यू अजारांबाबत नागरीकांना मार्गदर्शन केले. यावेळी आरोग्य सेवक पवन काळे (पाटील), मनोज बरेला प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सतीष सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. यात गावात जलताप रुग्ण सर्वेक्षण, कंटेनर सर्वेक्षण, हस्तपत्रिका वाटणे इत्यादी बाबी करण्यात आल्या. गाव पातळीवर हिवतापाची लक्षणे, उपचार, हिवताप प्रतिरोध उपाययोजनांबद्दल माहिती नागरिकांना देण्यात आली. नागरिकांनी आपापल्या घरातील पाणीसाठे झाकून ठेवणे, घरासमोरील नाल्या वाहत्या करणे, खिडक्यांना जाळ्या बसवणे, शौचालयाच्या व्हेण्ट पाईपला जाळी बसवणे, घरासमोर पाणी साचू न देणे,आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळणे अशा सूचना यावेळी नागरिकांना देण्यात आल्या. यामध्ये मालोद व आडगांव येथील सर्व कर्मचारी व आशा वर्कर यांनी सहभाग घेतला होता.