पोलीस निरीक्षकांनी मागितली जाहीर माफी; मात्र किर्तनकार आंदोलनाच्या पवित्र्यात !

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  वारकरी संप्रदायात मानल्या जाणाऱ्या नारदाच्या पवित्र गादीवर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांनी स्टेवर येवून बुटासहीत पाय ठेवल्याची घटना घडली होती. या घटनेबाबत वारकरी संप्रदायात संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेबाबत पो.नि. पाटील यांनी वारकरी संप्रदायाची जाहीर माफी मागितली असली तरी मात्र किर्तनकार यांनी निलंबनासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

 

अशी घडली घटना

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील हनुमानसिंग राजपूत नगर परिसरात असलेल्या संतोषी माता मंदीराजवळ किर्तन सप्ताहाचा कार्यक्रम रात्री १० नंतर सुरू होता. ही बाब चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांना समजल्याने त्यांनी किर्तनाच्या ठिकाणी आले. दरम्यान, पोलीस निरीक्षक पाटील हे बुटासहित स्टेजवर आले. यावेळी वारकरी संप्रदायात पवित्र मानल्या जाणाऱ्या नारदाच्या गादीवर बुटासहीत पाय ठेवला. राज्यभरातील वारकारी संप्रदाय व हिंदू जनमानसात तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या.

 

आ. मंगेश चव्हाण यांनी चूक लक्षात आणून दिली

या घटनेबाबत आमदार मंगेश चव्हाण यांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी लागलीच पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांच्याशी संवाद साधून केलेली चुक लक्षात आणून दिली व उद्या राज्यभरात पडसाद उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्ननिर्माण होईल याची कल्पना दिली. दरम्यान, ही घटना आपल्याकडून सदर घटना अनवधानाने झाली असून मला पवित्र अश्या नारदाच्या गादीचे महत्व आपणास माहिती नव्हते असे पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांनी सांगून  कर्तव्य बजावत असताना हि चूक झाली असल्याने मी सर्व वारकरी संप्रदायाची जाहीर माफी मागण्यास तयार असल्याचे देखील सांगितले.

 

बैठकीत पोलीस निरीक्षकांनी मागितली जाहीर माफी

आमदार मंगेश चव्हाण यांनी वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, मान्यवर व पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांची बैठक आपल्या अंत्योदय जनसेवा कार्यालयात घडवून आणली. त्यावेळी पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी विठ्ठलाच्या प्रतिमेला साक्षी ठेवून अनवधानाने घडलेल्या या चुकीबद्दल जाहीर माफी मागत असल्याचे सांगितले.

 

आ. मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, मी स्वतः वारकरी पुत्र असल्याने माझ्याही भावना दुखावणे साहजिकच होते मात्र तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांचे काम, त्यांनी शहरातील अवैध धंधे, मुलींची छेड गाडणारे गावगुंड यांचा केलेला बंदोबस्त व आजवरची त्यांची कामगिरी माझ्यासह चाळीसगाव शहराने अनुभवली असल्याने या सर्व विषयावर पडदा पडावा, तसेच सर्व समाजाला सदर घटनेतील पोलीस प्रशासनाची बाजू कळावी या उद्देशाने चाळीसगाव शहरातील वारकरी संप्रदायातील कीर्तनकार व मान्यवर मंडळी सोबत त्यांची बैठक आज चाळीसगाव येथील कार्यालयात घडवून आणली असल्याचे सांगितले पुन्हा अश्या घटना घडणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना देखील पोलीस प्रशासनाला केल्या.

 

यांची होती उपस्थिती

यावेळी हभप राम महाराज, हभप सुधाकर तात्या, हभप ए.बी.पाटील, हभप ओझर लीलाधर महाराज, हभप राम महाराज, पातोंडा येथील ह.भ.प.अल्केश महाराज, ह.भ.प. विनय महाराज हिरापूर, ह.भ.प. मयूर महाराज, ह.भ.प. रोहिदास महाराज, ह.भ.प. उदय महाराज, ह.भ.प. विनीत महाराज, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील, भाजपा अध्यात्मिक आघाडी जिल्हा समन्वयक भूषण पाटील, भाजपा किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुरेश महाराज आदी उपस्थित होते.

 

परंतू किर्तनकारांची आंदोलनाच्या पवित्र्यात 

आ. मंगेश चव्हाण यांनी मध्यस्थी केली असता. त्यांचा प्रयत्न फसला आहे. आध्यात्मिक आघाडी वगळता वारकरी संप्रदायातील किर्तनकारांनी निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर ५ मे तारखेपर्यंत निलंबित न करण्यात आल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजन आंदोलन ६ मे रोजी करण्याचा इशारा हभप ज्ञानेश्वर जळकेकर यांनी केले आहे.

Protected Content