दिव्यांग मुस्लिम बांधवांना ईद निमित्त रेशन किट वाटप

धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगाव तहसील कार्यालयामार्फत दिव्यांग मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त रेशन किट वाटप करण्यात आले.

रमजान ईदचे औचित्य साधून धरणगाव तहसील कार्यालय व दिव्याग महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने मुस्लिम दिव्याग बांधवांना रऊफ, अस्लम पठाण  नजराणा मेहबूब, परवीन हैदर, फातेमा फतू, आरिफ खान यांना एका महिन्याचे रेशन किट वाटप करण्यात आले.

या प्रसंगी गुलाबराव वाघ, संजय निराधार समितीचे अध्यक्ष तहसीलदार नितीनकुमार देवरे, दिव्यांग महा संघटनेचे संस्थापक पी.एम.पाटील, विलास पवार, चर्मकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भानुदास विसावे यासह इतरांची उपस्थिती होती.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!