संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे निधन

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संतूर वाद्याला प्रतिष्ठा मिळवून देणारे संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे आज १० मे रोजी त्यांचे निधन झाले. त्यांना संपूर्ण भारतातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील श्रद्धांजली वाहिली.

संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे हृदयविकाराने आज सकाळी त्यांचे निधन झाले. ते ८४ वर्षाचे होते.  पंडित शर्मा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यविधी करण्याचे मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना आदेश दिले आहेत.

भारतीय संगीत क्षेत्राचा एक मानबिंदू अस्ताला गेला – मुख्यमंत्री ठाकरे 

संपूर्ण भारतातून प. शिवकुमार शर्मा यांना श्रद्धांजली वाहिली जात असून ‘संतूर या वाद्याची जगाला ओळख करून देणारा, संतूरच्या अलौकिक तरंगांनी जगाला भुरळ घालणारा भारतीय संगीत क्षेत्राचा एक मानबिंदू अस्ताला गेला आहे, पंडित शर्मा आणि संतूर वाद्य यांचे अतूट असे नाते आहे. त्यांच्या नावानेच संतूरला ओळख मिळाली. पंडित शर्मा यांच्या अखंड साधनेचे योगदान आहे. विनम्र स्वभावाच्या पंडित शर्मा यांनी संगीत क्षेत्राची अखंड सेवा केली. पंडित शर्मा यांचे योगदान भारतीय संगीत क्षेत्राला कदापिही विसरता येणार नाही. अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आकस्मिक जाणे धक्कादायक – राज्यपाल कोश्यारी  

यासोबतच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील पंडित शिवकुमार शर्मा यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. पं. शिवकुमार शर्मा यांचे आकस्मिक जाणे धक्कादायक आहे. भारतीय शास्त्रीय संगीतात पं. शिवकुमार शर्मा यांनी अद्भुत अदाकारीने संतूर वाद्य जागतिक स्तरावर नेले. तसेच महान कलाकार, श्रेष्ठ गुरु, संशोधक, सुहृद असलेल्या शिवकुमार शर्मा यांनी अनेक उत्तम शिष्य घडवत संगीत विश्व समृद्ध केले आहे. त्यांनी आपल्या वादनातून शास्त्रीय संगीतात नवनवे प्रयोग यशस्वी चिंतनशील व्यक्तिमत्त्वातून यशस्वी करून दाखविले. पं. शर्मा यांना आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

Protected Content