भुसावळात रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांचा भारिपने केला अनोखा निषेध

bhusaval khadde

भुसावळ, प्रतिनिधी | शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे निष्पाप लोकांचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे लोकांना भारिप-बहुजन महासंघाने खड्ड्यांजवळ नागरिकांना सावधान करणारे सूचना फलक लावून शहराचे आमदार व नगराध्यक्ष यांचा निषेध व्यक्त केला आहे. या फलकांवर लिहिले आहे की, ‘आमदार व नगराध्यक्षांच्या मेहेरबानीने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात आपला जीव जाऊ शकतो, वाहने सावकाश चालवा.’

 

या आंदोलनाचे नेतृत्व भारिपचे युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, तालुकाध्यक्ष रुपेश साळुंखे, शहराध्यक्ष गणेश जाधव यांनी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत केले. याप्रसंगी जिल्हा महासचिव दिनेश इखारे, युवा जिल्हा उपाध्यक्ष तुषार जाधव, युवा जिल्हा सचिव सागर खरात, जिल्हा नेते सुदाम सोनवणे, युवा शहराध्यक्ष निलेश जाधव, अरुण तायडे, अरुण नरवाडे, पल्ला घारू, आकाश जाधव, सोनू बनसोडे, रोहित तायडे, रोहन तायडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content