दीक्षाभूमीतील भूमिगत पार्किगच्या विरोधात आंदोलन

नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्या लाखो अनुयायांसह नागपुरातील दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. या जागेवर तीन मजली भूमिगत पार्किगच्या मुद्द्यावरून मोठा गदारोळ सुरू आहे. आज मोठ्या संख्येने आंदोलका दीक्षाभूमी येथे जमा झाले होते. त्यांनी भूमिगत पार्किगला विरोध केला आहे. यावेळी तेथे तयार करण्यात आलेला लोखंडी ढाचा पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. याशिवाय काही जाळपोळीच्या घटना घडल्याचंही समोर आलं आहे.

नागपूर-दीक्षाभूमी येथील भूमिगत पार्किंगला आंदोलकांकडून विरोध केला जात आहे. याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून स्मारक समिती आणि आंदोलकांमध्ये चर्चा सुरू होती. त्यातही या जागेवर निवासी व्यवस्था उभारा किंवा इतर सुविधा उभारा असे आंदोलकांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र भूमिगत पार्किंगला त्यांचा विरोध आहे. यामुळे ऐतिहासिक स्तूपाला धोका असल्याचं सांगितलं जात आहे. तीन मजली भूमिगत पार्किंग स्तूपाच्या जवळ असल्याने त्याला धोका असल्याची भूमिका आंदोलकांकडून व्यक्त केली जात आहे. दीक्षाभूमी परिसरात खोदकाम केल्यामुळे येथील ऐतिहासिक बोधी वृक्ष नष्ट होण्याची भीती आहे.

Protected Content